राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिश्किल भाष्य करत नक्कल, बघा व्हिडीओ
VIDEO | शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे का घेतला, याचं राज ठाकरे यांनी सांगितलं कारण, बघा काय केलं मिश्किल भाष्य
रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि दिलेला राजीनामा मागेही घेतला. मात्र शरद पवार यांच्या घोषणेने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. ज्याक्षणी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली निवृत्तीची घोषणा मागे घेतली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. मात्र या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते मात्र अजित पवार नव्हते. तर शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांचा वेगळाच सूर पाहायला मिळाला. दरम्यान काल झालेल्या रत्नागिरीतील राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. तर राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला…