लोकसभेपूर्वी ‘मनसे’ची मोर्चेबांधणी सुरू, कधी कुठे असणार राज ठाकरे यांचे दौरे?
आजपासूनच राज्यभरातील राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कांदिवलीतील पोयरसमध्ये दाखल झाले आहेत. लोकसभेपूर्वी 'मनसे'ची मोर्चेबांधणी सुरू झाली असून या दौऱ्यांतर्गत राज ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
मुंबई, ५ मार्च २०२४ : आगामी लोकसभेपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आजपासूनच राज्यभरातील राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कांदिवलीतील पोयरसमध्ये दाखल झाले आहेत. लोकसभेपूर्वी ‘मनसे’ची मोर्चेबांधणी सुरू झाली असून या दौऱ्यांतर्गत राज ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मलाडमधील कार्यालयांना भेटी दिल्यात. उद्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयांना ते भेटी देतील. तर ७ ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे हे नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ११ मार्च रोजी दक्षिण मुंबई, १२ मार्च रोजी दक्षिण मध्य मुंबई, १३ मार्च उत्तर मध्य मुंबई, १४ मार्च इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाला राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत.