Raju Patil : ‘पलावा पुलाचे उद्घाटन 31 एप्रिलला, उद्धाटक कुणाल कामरा’, मनसे नेत्याचा सरकारला टोला
पलावा पुलाच्या सुरू असलेल्या संथ कामावरून मनसेचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बघा काय केलं ट्वीट?
डोंबिवली येथील पलावा पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या वेगावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सरकारवर भाष्य करत पलावा पुलाच्या कामाच्या संथ गतीवरून टोला लगावला आहे. तर पलावा पुलाचं उद्घाटन हे येत्या ३१ एप्रिल रोजी होणार आहे. तर या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा यांचं नाव देत राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून खोचक टोला लगावला आहे. तारखांच्या आश्वासनांनी ‘फुल्ल’ ! कधी होणार दोन्ही पलावा पुल?, असा खोचक सवाल मनसेचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केला आहे. सोशल मिडियावरील ट्वीटर अर्थात एक्सवर एक फोटो शेअर करत राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, बनत होता.. बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल? असा सवाल करत MMRDA आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर द्या, असं म्हणत ही पोस्ट टॅग करत केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजू पाटील यांच्याकडून स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याचे आभार व्यक्त करण्यात आले होते. डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल राजू पाटील यांनी कुणाल कामराला धन्यवाद दिले होते.
तारखांच्या आश्वासनांनी 'फुल्ल' !
कधी होणार दोन्ही पलावा पुल ?….की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ?
उत्तर द्या @mieknathshinde @MMRDAOfficial #वाट_बघा #वाट_लावलीय #AprilFool #Dombivali #kalyan_shil_road #palava #टक्केवारी #KD_यम_C #अनधिकृत_पलावा_जंक्शन #MNS pic.twitter.com/6b01fJUeT1— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 1, 2025

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे

अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...

‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
