Breaking | मनसेची हिंद मजदूर सभेत एन्ट्री, WCL कामगारांसाठी मनसे काम करणार
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये वैर वाढत असतानाच, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच परप्रांतीयांचा मुद्द्याला बगल देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे नेत्याची राष्ट्रीय स्तरावरील ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री झाली आहे.

विदर्भातील मनसे नेते राजू उंबरकर यांची ‘हिंद मजदूर सभे’चे महाराष्ट्रात महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेच्या हाती राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेची धुरा आली आहे. ‘हिंद मजदूर सभा’ देशातील WCL (Western Coalfields Limited) कामगारांची मोठी संघटना आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करत मनसेनं ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री केली.
Latest Videos