शिंदे गटाचा मनसेवर डोळा? संदीप देशपांडे म्हणतात….
मनसेने एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिंदे गटाने (Shinde group) मनसे फोडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचा आरोप संजय नाईक यांनी काल केला होता.
मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांवर शिंदे गटाचा मनसेवर डोळा असल्याची चर्चा आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही यासंदर्भात आरोप केले आहेत. ते म्हणाले, संजय नाईकांनी मांडलेली ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी अमिषं दाखवून प्रयत्न चालू आहेत. पण महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा सैनिक राज ठाकरेंसोबत आहे, तो कुठेही जाणार नाही, असं वक्तव्य संदीप देशपांचे यांनी केलंय. मनसे नेते संजय नाईक यांनी काल शिंदे गटावर आरोप केलेत. मनसेने एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिंदे गटाने (Shinde group) मनसे फोडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Published on: Sep 29, 2022 02:00 PM
Latest Videos