श्रीराम काय खायचे माहित नाही, पण राष्ट्रवादीनं पैसे खाल्ले, आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर मनसेचा घणाघात

श्रीराम काय खायचे माहित नाही, पण राष्ट्रवादीनं पैसे खाल्ले, आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेचा घणाघात

| Updated on: Jan 05, 2024 | 12:14 PM

राम बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले तर रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. राम १४ वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. शिर्डी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या शिबीरात जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं.

मुंबई, ५ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे संपूर्ण राज्यात एकच रोषाचं वातावरण होतं. राम बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले तर रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. राम १४ वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. शिर्डी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचं शिबीर सुरू होतं. या शिबीरादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दलचं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकच टीकेची झोड उठवली. भाजप आणि अजित पवार गट देखील जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक झाला तर आता मनसेने देखील यावर भाष्य केले आहे. श्रीराम काय खायचे माहित नाही, पण राष्ट्रवादीवाले पैसे खायचे, असी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले.

Published on: Jan 05, 2024 12:14 PM