आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुपकडे मुंबईतील महत्वाचा प्रकल्प; मनसेचा राज्य सरकारला सवाल

आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुपकडे मुंबईतील महत्वाचा प्रकल्प; मनसेचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Feb 09, 2023 | 4:03 PM

आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुपकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प सोपवण्यात आला आहे. यावरून मनसे आक्रमक आक्रमक झाली आहे. पाहा...

मुंबई : आधीच अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुपकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प सोपवण्यात आला आहे. त्यावरून मनसेनं राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. “धारावी पुनर्विकास प्रकल्प ज्यावेळेस अदानी उद्योग समूहास देण्यात आला त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती 360 अंशाने पूर्णपणे बदललेली आहे. हिडेंनबर्गच्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात अस्थिरता आहे. फ्रेंच कंपनीने 50 अब्ज डॉलरची भागीदारी असलेला प्रकल्प थांबवला आहे. त्यांनी अदानी यांच्याकडे एक रिपोर्ट मागितलाय. या सगळ्या परिस्थितीत धारावी पुनर्विकासासाठी लागणारी आर्थिक ताकद आज अदानी उद्योग समूहाकडे आहे का? जर असेल तर ती भविष्यात राहणार आहे का? या सगळ्याचा विचार राज्य सरकारने हा प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याआधी करायला हवा”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Published on: Feb 09, 2023 03:32 PM