MNS on Mumbai Local Train | लोकल सुरू करा अन्यथा 'रेल भरो' आंदोलन, संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा

MNS on Mumbai Local Train | लोकल सुरू करा अन्यथा ‘रेल भरो’ आंदोलन, संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 30, 2021 | 11:14 AM

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे

सर्वसामान्यांना त्यातही लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसे रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत संदीप देशपांडे?

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे

Published on: Jul 30, 2021 11:14 AM