… आणि हात पसरून म्हणाले आता जा, बाळासाहेबांसोबतचा अखेरच्या ‘राज’कीय संवादाचा ‘तो’ व्हिडिओ मनसेकडून शेअर
शिवसेना पक्ष सोडतानाचा राज ठाकरे यांनी रवींद्र नाट्यमंदिरात मनसेच्या मेळाव्यात सांगितलेला 'तो' किस्सा काय होता...मनसेने केला व्हिडीओ शेअर
शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळीकडून अभिवादन केले जात असताना मनसेकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मनसेने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडतानाचा शिवसेनाप्रमुखांसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला होता. यामेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा किस्सा ऐकवला होता. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची भेट घेतली होती.