मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, फडणवीसांच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार?

मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, फडणवीसांच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार?

| Updated on: Apr 09, 2024 | 12:40 PM

मनसे महायुतीत येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार अशी मला अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे महायुतीतील प्रवेशाच्या आवाहनावर शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेचा आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आहे. मात्र या मेळाव्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या महायुतीच्या प्रवेशासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. मनसे महायुतीत येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार अशी मला अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे महायुतीतील प्रवेशाच्या आवाहनावर शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे. तिथे सध्या राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. भव्यदिव्य व्यासपीठ आणि त्यावर मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं लिहील्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे ज्या भव्य व्यासपीठावरून मनसैनिकांना संबोधित करणार आहे त्या व्यासपीठासमोर ६० ते ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आता फक्त राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Published on: Apr 09, 2024 12:40 PM