कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं दिला भाजला पाठिंबा

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं दिला भाजला पाठिंबा

| Updated on: Feb 14, 2023 | 8:37 PM

VIDEO | भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठींनंतर पोटनिवडणुकीत पाठिंब्याचा झाला निर्णय

पुणे: प्रदीप कापसे, Tv9 मराठी : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजप नेते आज मनसेच्या नेत्यांच्या भेटीला गेले होते. कसबा आचि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याचे समोर येत आहे. तर मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याप्रमाणे मनसे भाजपला मदत करणार आहे, मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. ते म्हणाले वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून भाजपला मदत करण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आहे. पुण्यातील भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि माधूरीताई मिसाळ यांनी मनसे नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे.

Published on: Feb 14, 2023 08:37 PM