Konkan Graduate Election : मोठी बातमी, कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेचा यु-टर्न, भेटीगाठीत नेमकं काय घडलं?
मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत, असे नितीन सरदेसाई म्हणाले.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू असताना मनसेने मोठा यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत, असे नितीन सरदेसाई म्हणाले. तर दोन दिवसापूर्वी 3 जूनच्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे यांनी कोकण पदवीधरची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. पानसे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे उमेदवार असतील अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी निरंजन डावखरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे सरदेसाई यांनी म्हटले.