Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : औरंगजेब इथं गाडलाय..., राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर मनसेनं कुठं केली बॅनरबाजी?

MNS : “औरंगजेब इथं गाडलाय…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेनं कुठं केली बॅनरबाजी?

| Updated on: Apr 02, 2025 | 12:10 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राज्यभरात औरंगजेब आलमगीर याच्या कबरीवरून वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी यासाठी वाद रंगताना दिसतोय. तर काही राजकीय नेते याविरोधात आहेत. औरंगजेबाची कबर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा, इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवू नये, असं काही नेते मंडळीचं मत आहे. अशातच राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क येथे गुढी पाडवा मेळाव्यातून याविषयावर भाष्य केले. ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला असा बोर्ड लावा. तर औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या सहली घेऊन गेलं पाहिजे’, राज ठाकरेंनी असं वक्तव्य करत भर मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सुनावल्याचे पाहायला मिळाले. तर आता छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून औरंगजेबासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला’, असा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बॅनरबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आ्रहे. बघा नेमकं काय म्हटलंय या बॅनरवर? आणि कोणत्या भागात झळकले हे बॅनर?

Published on: Apr 02, 2025 12:10 PM