Special Report | कायद्याचा धाक उरला की नाही?
कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीसह दोन तरुणांना जमावकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीसह दोन तरुणांना जमावकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर तरुणी उल्हासनगरहून डोंबिवलीला जात होती. दरम्यान, रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढली. त्यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतले. तिच्या दोन मित्रांनी रिक्षावाल्या सोबत वाद घातला. परंतु त्यावेळी तिथे जमलेल्या जमावाने गैरसमज करून तरुणी आणि तिच्या मित्रांनाच मारहाण केली. कोळसेवाडी पोलीस या घटनेप्रकरणी तपास करत आहेत. (Mob thrashes woman and her two friends in Kalyan)
Latest Videos