Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थानच नाही, फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट
'भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आताही समावेशाचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यांना आमच्याकडून ऑफर देण्यात आली होती पण....', अजित पवार गटासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा गौप्यस्फोट काय?
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. पुढे फडणवीस असेही म्हणाले की, मला विश्वास आहे, भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आताही समावेशाचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यांना आमच्याकडून ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की, तुम्ही आम्हाला पुढच्यावेळेस दिलं तेव्हा चालेल पण आम्हाला मंत्रिपद द्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.