Modi 3.0 Cabinet : महापालिकेतून थेट केंद्रीय मंत्रीपदी, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी
पुणे लोकसभा मतदार संघातील ४ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असताना मुरलीधर मोहोळ यांचा अखेरच्या क्षणी विजय झाला. अशातच आता पहिल्याच टर्ममध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मोठी लॉटरी लागली असून मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जादू करणारे रवींद्र धंगेकर यांची जादू यंदा लोकसभेत काही चालली नाही. पुणे लोकसभा मतदार संघात तिरंगी लढतीत काँग्रेस आणि भाजपच्या या लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना जनतेनं काही तारलं नाही. तर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास ८८ हजार मतांनी विजय मिळवला. पुणे लोकसभा मतदार संघातील ४ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली असताना मुरलीधर मोहोळ यांचा अखेरच्या क्षणी विजय झाला. अशातच आता पहिल्याच टर्ममध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मोठी लॉटरी लागली असून मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. त्यामुळे महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहे.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप

Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
