Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी संदर्भात मोठी बातमी, केंद्र सरकार काय घेणार निर्णय?
केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितलं जातंय. तर काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांची भेट घेतली आहे.
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : कांदा निर्यातबंदी संदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितलं जातंय. तर काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांची भेट घेतली आहे. तर पुढील आठवड्याभरात केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केल्यानं शेतकरी, उत्पादकांमध्ये नाराजी आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. नाशिक, पुणे, सोलापूर बाजार समित्यांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहचले होते. आता ते निम्म्यावर आले आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.