Mohan Delkar | मोहन डेलकर यांचं कुटुंबीय शिवसेनेत प्रवेश करणार
मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आण मुलगा अभिनव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.