Breaking |मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Breaking |मोहित कंबोज आणि रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

| Updated on: Aug 17, 2022 | 10:11 PM

रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यानंतरही त्या आज फडणवीस यांना भेटायला आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने अनेक त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

मुंबई : मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यानंतरही त्या आज फडणवीस यांना भेटायला आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कंबोज आणि रश्मी शुक्ला दोघेही एकाच वेळी सागर बंगल्यावर आल्याने अनेक त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का? रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चाही या निमित्ताने सुरू झाल्या आहेत.महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Published on: Aug 17, 2022 10:11 PM