Nawab Malik Tweet | हा सॅम डिसूझा नाही, सॅनविल स्टॅनली डिसूझा आहे, मलिक यांचं  ट्विट

Nawab Malik Tweet | हा सॅम डिसूझा नाही, सॅनविल स्टॅनली डिसूझा आहे, मलिक यांचं ट्विट

| Updated on: Nov 07, 2021 | 11:19 AM

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला आहे.

मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने त्याला पार्टीला बोलावलं होतं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कुणी नसून मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो 12 हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला. त्याच प्रमाणे हा सॅम डिसूझा नाही, सॅनविल स्टॅनली डिसूझा आहे, मलिक यांचं ट्विट त्यांनी केले आहे

Published on: Nov 07, 2021 11:14 AM