हुप्पा हुय्या ! माकडांनी केलं नागरिकांना सळो की पळो, बघा व्हिडीओ

हुप्पा हुय्या ! माकडांनी केलं नागरिकांना सळो की पळो, बघा व्हिडीओ

| Updated on: Jan 31, 2023 | 10:18 AM

सिव्हिलाइन परिसरातील इंगळे चौकात ८ ते १० माकडांनी माजविला चांगलाच उच्छाद, नागरिक हैराण

गोंदिया जिल्ह्यात काही माकडांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. काही माकडांनी जिल्ह्यात चांगलाच उच्छाद माजविला आहे, आज गोंदिया शहरातील मुख्य परिसर असलेल्या सिव्हिलाइन परिसरातील इंगळे चौक या परिसरात ८ ते १० माकडांनी चांगलाच उच्छाद माजवला असून अनेकांच्या दुकानांचे, घरांचे, तसेच गाड्यांचे या माकडांनी मोठे नुकसान केले आहे.

माकडांनी चांगलाच उच्छाद माजविला असल्याने काही दुकानाच्या काचा फुटल्या तर काही दुकानासमोर ठेवलेल्या दुचाकी गाड्यांचा नुकसान या माकडांनी केले आहे. तर चारचाकी गाडयांना देखील डेमेज केले आहे. यामुळे परिसरातील लोकांनी हातात काठ्या घेऊन त्या माकडांना पळविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र हे माकडं शहराबाहेर जाण्याचे काही नाव घेत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Published on: Jan 31, 2023 09:59 AM