Tekchand Sawarkar Dance | भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा भन्नाट डान्स – tv9
भाजपचे नागपूरचे आमदार टेकचंद सावरकर यांचा एक भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर ते आला बाबूराव गाण्यावर ठेका धरताना दिसतस आहेत.
नुकताच राज्याचे पावसाळी अधिवेशन संपलं आहे. याअधिवेशनात यावेळी विरोधकांनी चांगल्याच घोषणा देत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी देखिल जशासतस उत्तर देत विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर चांगलाच राडा पहायला मिळाला. यादरम्यान भाजप आमदार प्रशांत बंब यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली. तसेच आता एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा भाजप चर्चेत आली आहे. यावेळी भाजपचे नागपूरचे आमदार टेकचंद सावरकर यांचा एक भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर ते आला बाबूराव गाण्यावर ठेका धरताना दिसतस आहेत. वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार सावरकर यांनी कार्यकर्त्यांसोबत डान्स केलेला आहे. आणि आता त्याचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on: Aug 26, 2022 12:35 PM
Latest Videos