मान्सून 4 जूनला केरळमध्ये तर महाराष्ट्रात कधी होणार दाखल? हवामान विभागानं म्हटलं…
VIDEO | महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास अजून किती दिवस वाट पाहवी लागणार?
मुंबई : मे महिन्यातील उन्हानं नागरिक वैतागले असताना पाऊस कधी पडेल याची ते वाट पाहत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनच्या आगमानबाबत मोठी अपडेट दिली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास ४ जून होणार आहे. तर मान्सूनसाठी अजून ८ ते १० दिवस वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान खात्याच्या के एस होसाळीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. तर पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही हवामान खात्याच्या के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे. तर राज्यात यंदा सरासरी किती पाऊस राज्यात होईल याबाबत सांगतांना के एस होसाळीकर म्हणाले, संपूर्ण देशात सरासरी ९६ टक्के इतका पाऊस होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.