अजित पवार यांचं अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज, तर हे आव्हान स्वीकारलं अन् म्हणाले.....

अजित पवार यांचं अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज, तर हे आव्हान स्वीकारलं अन् म्हणाले…..

| Updated on: Dec 26, 2023 | 11:39 AM

शिरूरमध्ये माझाच उमेदवार जिंकणार असा दावा अजित पवार यांनी केला आणि अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलंय. दादांना तळ ठोकून रहावं लागतंय म्हणजे....काय म्हणाले अमोल कोल्हे?

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : अजित पवार यांनी बारामतीनंतर आता आपला मोर्चा शिरूरकडे वळवला. शिरूरमध्ये माझाच उमेदवार जिंकणार असा दावा अजित पवार यांनी केला आणि अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलंय. दादांना तळ ठोकून रहावं लागतंय म्हणजे माझ्यासाठी ही पोहोच पावती असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. अजित दादांच्या बंडानंतर त्यांच्या शपथविधीवेळी अमोल कोल्हे राजभवनात होते. मात्र त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया अचंबित करणारी होती. तर दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आले. मात्र तरीही अमोल कोल्हे कोणाकडे यांच्या विविध चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे मंत्रालयात अजित पवार यांनी भेटले. मात्र आता अजित पवार यांच्या बोलण्यातून कोल्हे अजित पवार यांच्या गटात नाही हे स्पष्ट झालंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 26, 2023 11:38 AM