अजितदादांच्या 'त्या' ओपन चँलेंजवर अमोल कोल्हे म्हणाले, ... तर शंभर टक्के लढणार

अजितदादांच्या ‘त्या’ ओपन चँलेंजवर अमोल कोल्हे म्हणाले, … तर शंभर टक्के लढणार

| Updated on: Dec 25, 2023 | 12:51 PM

खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर करत खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हानच दिलं. या आव्हानावर भाष्य करत अमोल कोल्हे म्हणाले, मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करतोय...

पुणे, २५ डिसेंबर २०२३ : खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर करत खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हानच दिलं. या आव्हानावर भाष्य करत अमोल कोल्हे म्हणाले, मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. निवडणूक म्हणजे एकाने दुसऱ्याला आव्हान देण्याची गोष्ट नाही. ही प्रतिनिधीत्व करण्याची बाब आहे. प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. दादा हे मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला मी मोठा नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार. मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार आहे. तर शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Published on: Dec 25, 2023 12:51 PM