... तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल

… तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल

| Updated on: May 30, 2023 | 12:40 PM

VIDEO | गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या खासदाराचा सपोर्ट, पाटील 'या' अडनावावरून सुरू असलेल्या वादावर काय मांडली बाजू?

पुणे : लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ कायम आहे. तरूणांपासून ते वरिष्ठांपर्यंत गौतमीने आपल्या नृत्याची सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. अशातच गौतमी पाटीलच्या अडनावावरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर तिने आपले नाव बदलावे अशी मागणीही केली गेली. यासह तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी होतेय. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी समाजातील ठेकेदारांना चांगलंच फटकारलं आहे. लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकाराच्या बाबती होत असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले. पुढे ते म्हणाले की, गौतमीच्या यशाची ती फेज आहे, ती पचवण्यासाठी समाजाने तिला मदत करावी. तिचे वय खूप लहान आहे. ग्रामीण भागातील तरुण आज तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या कार्यक्रमांना प्रंचड गर्दी होतेय. परंतु ज्यावेळी गौतमी परिस्थीत हलाखीची होती तेव्हा दोन वेळचे जेवण द्यायला यातला कोणी गेलं नाही. आज ती तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय कारण आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला.

Published on: May 30, 2023 12:40 PM