थेट दिल्लीहून अंगणेवाडीत अरविंद सावंत अन् भराडी देवीकडे मागितलं ‘हे’ मागणं
'आज कलियुग आहे की कळीयुग हे समजत नाही'; अरविंद सावंत यांची सताधाऱ्यावर जोरदार टीका, म्हणाले...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील अंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आजपासून सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अंगणेवाडीत जाणार आहेत. अशातच थेट दिल्लीहून मालवणात खासदार अरविंद सावंत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी असे म्हटले की, ही भराडी देवी आणि गावच्या मातीची ओढ आहे. श्रद्धा असल्याने मी फार पूर्वीपासून देवीच्या दर्शनाला येत असतो. पण मी जेव्हा आलो तेव्हा देवीकडे एकच साकडं घातलं तुझे आशीर्वाद कायम राहूदे आणि यावेळीही भराडी देवीकडे प्रार्थना केली आहे. ‘आता कलियुग आहे की कळीयुग आहे, हे समजत नाही. देशात आज सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थैर्य दिसत नाही. देशाला वाचवण्यासाठी बळ दे’, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी अंगणेवाडीच्या यत्रोत्सवात हजेरी लावत भराडी देवीकडे मागणं मागितलं आहे.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा

'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
