Santosh Deshmukh Case : CID च्या 9 पथकांना गुंगारा? वाल्मिक कराडला कोणाचा सहारा? आरोपीची कार अजितदादांच्या ताफ्यात?
वाल्मिक कराड 22 दिवस फरार राहतो. नऊ सीआयडीची पथक नेमूनही त्याचा शोध लागत नाही. पण धक्कादायक म्हणजे ज्या पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून येत कराड सरेंडर झाला त्याच फरार आरोपीला फिरवणारी गाडी या 22 दिवसात अनेक ठिकाणी कशी फिरते हा प्रश्न आहे.
आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला तीच गाडी बीडमधल्या अजित पवार यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात असल्याचा मोठा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हीच गाडी केज पोलीस ठाण्यात सुद्धा आली होती. असं भाजपचे सुरेश धस यांनीही म्हटलेल आहे. एकीकडे वाल्मिक कराड फरार असताना सीआयडीची नऊ पथकं त्याच्या शोधावर होती. पण आरोपानुसार कराड ज्या गाडीने सीआयडीकडे सरेंडर झाला तीच गाडी 21 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात होती. मस्साजोगला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी अजित पवार जेव्हा गेले, तेव्हा देखील तीच स्कॉर्पिओ त्यांच्या ताफ्यात फिरली. त्याच गाडीने कराड पुण्यात सरेंडर झाला. धसांच्या आरोपानुसार हीच गाडी नंतर केज पोलीस ठाण्यात देखील दिसली. एमएच 23 बीजी 2231 या नंबरची ही स्कॉर्पिओ गाडी मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळीचे असून अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर या गाडीचं रजिस्ट्रेशन आहे. ज्या वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सीआयडीला देखील मिळू शकला नाही त्याच्या संपर्कात धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याची गाडी कशी काय आली? आपण एका फरार आरोपीला पोलिसांपासून दूर ठेवण्यासाठी गाडी पुरवतोय याची मुंडे यांच्या कार्यकर्त्याला कल्पना लागली नाही का? याच उत्तर अद्याप मिळू शकलं नाही. बघा स्पेशल रिपोर्ट…