अन् उदयनराजे भोसले गहिवरले, जनता दरबार सुरू असताना एका आजींची हजेरी; बघा व्हिडीओ

अन् उदयनराजे भोसले गहिवरले, जनता दरबार सुरू असताना एका आजींची हजेरी; बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 07, 2023 | 8:41 PM

VIDEO | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जनता दरबारात असं काय झालं की कणखर असणारे भोसले भावूक झाले, बघा व्हिडीओ

सातारा : साताऱ्यात असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले नियमित जनता दरबार घेतात आणि जनतेचे प्रश्न सोडवतात. मात्र आजच्या जनता दरबारमध्ये उदयनराजे भोसले भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आजच्या जनता दरबारात एक हृदयस्पर्शी क्षण घडला. आजच्या जनता दरबारात एक आजीबाई आल्या आणि त्यांनी उदयनराजेंच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशिर्वाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे उदयनराजे थोडे गहिवरले त्यांनी आजींना हात जोडून नमस्कार केला. ‘आम्हाला नियमित भेटणाऱ्या नागरिकांपैकी एक आज्जी आज भेटायला आल्या आमची आस्थेने विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमळ लोकांचे आशीर्वाद व खंबीर साथ माझ्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असेच आशीर्वाद मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असे त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले.

Published on: Mar 07, 2023 08:34 PM