शेकडो गाड्या, हजारो कार्यकर्ते; नाशिकहून हेमंत गोडसे तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
नाशिक इगतपुरी येथील पिंपरी फाटा येथून आपल्या शेकडो समर्थक देखील रवाना मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. समर्थकांचा शेकडो वाहनाचा ताफा मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत
खासदार हेमंत गोडसे हजारो कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा मतदारसंघाप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे. खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नाशिकहून रवाना झाले आहेत. यासह नाशिक इगतपुरी येथील पिंपरी फाटा येथून आपल्या शेकडो समर्थक देखील रवाना मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. समर्थकांचा शेकडो वाहनाचा ताफा मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. कार्यकर्त्यांची मागणी असल्याने मुखमंत्र्यांच्या भेटीसाठी जात असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अद्याप नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा कायम असल्याने या शक्ती प्रदर्शनामागे नेमका कोणता अर्थ आहे? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
Published on: Mar 24, 2024 06:55 PM
Latest Videos