‘मविआ’च्या वज्रमूठ सभेपूर्वी इम्तियाज जलील यांनी केलं आवाहन, म्हणाले…
VIDEO | संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकासआघाडी सभेच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी काय केलं आवाहन?
छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दोन गटातील राड्यानंतर शहरातील वातावरण शांत झाले आहे. तर आता राजकीय वातावरण तापल्याच बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीची आज संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आलीय. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीने सभेसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. याय दरम्यान तीन दिवसांपूर्वी माझ्या शहरात जे घडलं त्या पार्श्वभूमीवर मला लोकांनी विचारलं की, मविआची सभा पुढे ढकलण्याची आवश्यकता आहे का? तर मी नाही असं उत्तर दिलं. कारण लोकांमध्ये हा संदेश जायला हवा की, आता सगळं ठीक झालेलं आहे. पण एक अट अशी होती की, माझी विनंती आहे, महाविकास आघीच्या नेत्यांनी सभेतून प्रक्षोभक भाषण करु नका, ज्यामुळे शहराची शांतता भंग होईल, असे म्हणत छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आवाहन केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही सभा घ्यावी, मी महाविकास आघाडीच्या सभेचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली.