अमरावतीच्या जागेवरुन तिढा कायम, राणा-अडसूळांमध्ये रस्सीखेच सुरूच, कुणाला मिळणार तिकीट?
अमरावतीच्या जागेवरुन खासदार नवनीत राणा आणि अनंतराव अडसूळांमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. राणांचं जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप लागला नसल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे अडसूळ यांनी म्हटलं आहे.
मुंबई, २१ मार्च २०२४ : अमरावतीच्या जागेवरुन खासदार नवनीत राणा आणि अनंतराव अडसूळांमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. राणांचं जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप लागला नसल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे अडसूळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज अडसूळ पिता-पुत्र यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांची भेट घेतली. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अमरावती मधील सात निवडणुका युतीमध्ये लढल्या आहेत. अमरावतीची जागा शिवसेनेने लढले आहे. मी देखील या ठिकाणी पाच वेळा लढलेलो आहे. अमरावतीच्या जागेवरती आमचा कायदेशीर अधिकृत अधिकार आहे. तेथील स्थानिक नागरिक भाजपला मतदान करत नाहीत. मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाहीत जर उमेदवार नवनीत राणा असतील त्यांना मतं मिळणार नसल्याचे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 21, 2024 11:04 PM
Latest Videos