इस देश मे रहना है, तो श्रीराम…; नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना सुनावलं
गेल्या दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यंच्यावर भाष्य करत त्यांना इशारा दिला होता. यावर नवनीत राणा यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असल्यास अमरावतीमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय.
अमरावती, २१ फेब्रुवारी २०२४ : हिंमत असल्यास अमरावतीमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय. गेल्या दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यंच्यावर भाष्य करत त्यांना इशारा दिला होता. यावर नवनीत राणा यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. ‘खासदार इम्तियाज जलील ओबीसीचा चमचा… यांच्यात दम असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा’, असं खुलं आव्हान नवनीत राणांनी जलील यांना दिलंय. इतकंच नाहीतर नाही मी पाहते की तुम्ही संभाजीनगरमध्ये कसे निवडून येतात… इम्तियाज जलील ओवैसी यांचा चमचा आहे. या देशात राहायचं असेल तर जयश्री राम म्हणावंच लागेल, असे वक्तव्य खासदार नवनीत राणांनी करत खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी संभाजीनगरचे लोक संभाजी महाराजांना डाग लागू देणार नाही. तुमच्यासारखे छप्पन आले आणि गेले नवनीत राणा तुम्हाला घाबरणारी नाही, असेही त्यांनी म्हटले.