‘मग कळेल कौन किस खेत की मूली’, नवनीत राणांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
VIDEO | नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल अन् संजय राऊत यांनी दिलं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. यावेळी बोलत असताना नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे तुम किस खेत की मूली हो, अशी जोरदार टीका नवनीत राणा यांनी केली. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, नवनीत राणा यांना निवडणुकीला उभं राहुद्या मग अहंकार काय, कोण किती कौन किस खेत की मूली हे कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर आम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे त्या खासदार झाल्या आहेत. माझ्याकडे त्यांच्याविषयी जी माहिती आहे त्यानुसार त्या आरोपी आहेत. नवनीत राणा यांनी बनावट जातीचं प्रमाणपत्र सादर करत निवडणूक लढवली आणि अशा व्यक्तीने निवडणुकीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलावं, असं म्हणत संजय राऊत यांनी खोचक टीका नवनीत राणा यांच्यावर केली आहे.