मस्तीत आलेल्यांना… आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन काय?
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर... या उमेदवारीनंतर आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. बघा काय केलं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. तर नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत भाजपचे नेते पदाधिकारी पाहायला मिळाले. यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. ‘भाजपने अजून किती लाचारी पत्करावी, पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनेही काही क्षणापूरतं पक्षाचा विचार करू नये. तसंच ४०० पार आहे. एक सीट गेली तरी काही फरक पडणार नाही. ३०० खासदार आले तर मोदींची सत्ता येणार आहे. हा अतिरेक थांबवा. अबकी बार ४०० पार…त्यामुळे एक दोन सीट गेल्या मस्तीत आलेल्या… घालवा यांना..’, असं म्हणत बच्चू कडूंनी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Published on: Mar 28, 2024 01:34 PM
Latest Videos