नवनीत राणा यांनी केली अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अन् दिले थेट 'हे' आदेश

नवनीत राणा यांनी केली अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अन् दिले थेट ‘हे’ आदेश

| Updated on: Apr 08, 2023 | 8:21 PM

VIDEO | खासदार नवनीत राणा यांनी जिल्हातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना दिली नुकसानाची माहिती

अमरावती : अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा, गहू, हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. खासदार नवनीत राणा यांनी जिल्हातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. थेट शेतात जाऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. अनेक ठिकाणी गुरे -ढोर दगावले आहेत. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली आणि अमरावती तालुकातील भागाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करतांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना जिल्हात वादळी वारा आणि अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी शासनाला पंचनामा सह अहवाल पाठवण्याचे आदेश दिले.

Published on: Apr 08, 2023 08:20 PM