Navneet Rana | शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा : नवनीत राणा

Navneet Rana | शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा : नवनीत राणा

| Updated on: Sep 29, 2021 | 5:51 PM

पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही राहीलं नाही आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे आरामात मातोश्रीवर बसलेत अशी टीका राणा यांनी केली. तर, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असले तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करु देणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रतील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात आणि विदर्भात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकसानभरपाई आणि मदतीच्या मुद्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही राहीलं नाही आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे आरामात मातोश्रीवर बसलेत अशी टीका राणा यांनी केली. तर, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असले तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करु देणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

नवनीत राणा यांनी तुम्ही जोपर्यंत बांधावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सजमणार नाही, असं म्हटलं आहे. प्रति हेक्टर 30 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. राज्याला तुमची गरज आहे, असं मातोश्रीबाहेर पडून शेतीच्या नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करू देणार नाही, असा इशाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राणा यांनी दिला आहे.