‘त्यांनी आता फक्त त्यांचा पक्षा सांभाळावा…’; वडेट्टीवार यांना शिवसेना खासदाराचा टोला
तर त्यांना पाय उतार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. असाच दावा काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केला आहे.
बुलढाणा, 15 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपण आणि साताऱ्या दौऱ्यावरून सध्या चर्चा रंगल्या आहेत. तर त्यांना पाय उतार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा काँग्रेस नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. असाच दावा काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केला आहे. त्यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजारपणाचे कारण समोर करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी टोला लगावला आहे. जाधव यांनी, वडेट्टीवार यांना नुकताच विरोधी पक्षनेते पद मिळालं आहे. त्यामुळे ते आपण विरोधी पक्षनेता म्हणून किती सक्षम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुख्यमंत्री बदलासारख्या बातम्या पेरणे, चर्चेत राहणे हे त्यांना आवश्यक आहे. पण त्यांनी आता फक्त त्यांचा पक्षा सांभाळावा असा सल्ला जाधव यांनी वडेट्टीवार यांना दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक

अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
