शेतकरी नेता म्हणायला त्याची लायकी काय? रविकांत तुपकरांची कुणी काढली लायकी?
ते काय भूमिपूत्र त्यांनी स्वतःचाच विकास केला, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली होती. शेतकरी नेता म्हणायला त्याची किती लायकी आहे , मला समजत नाही. चांगले कपडे, चांगले जोडे शेतकऱ्यांनी घालू नये, अशी त्यांची भावना आहे का? असा सवाल प्रतापराव जाधव यांनी पलटवार केलाय.
शेतकऱ्यांबद्दल कधी आवाज उठवला नाही, महागडे घड्याळ-शूज, महागडे गॉगल वापरतात ते काय भूमिपूत्र त्यांनी स्वतःचाच विकास केला, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली होती. शेतकरी नेता म्हणायला त्याची किती लायकी आहे , मला समजत नाही. चांगले कपडे, चांगले जोडे शेतकऱ्यांनी घालू नये, अशी त्यांची भावना आहे का? असा सवाल करत प्रतापराव जाधव यांनी पलटवार केलाय. ते असेही म्हणाले की, मी सदन कुटुंबातील शेतकरी आहे. शेतीवर माझं पहिलेपासून प्रेम आहे ते आज, उद्या आणि कायम राहणार आहे. त्यामुळे असे आरोप करणाऱ्याला काही महत्त्व नाही. ही लोक भावनात्मक मुद्दे घेऊन शेतकऱ्यांसमोर जात आहेत. नदीजोड प्रकल्प जर पूर्ण झाला तर शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली येणार आहे, त्यामुळे आमचा शेतकरीही सुखी आणि समृद्ध होणार आहे, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
Published on: Apr 07, 2024 05:31 PM
Latest Videos