दिगंबर आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल : रणजितसिंह नाईक निंबाळकर
मात्र खा.निंबाळकर यांच्या जवळच्या एकेकाळच्या निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकदा पक्षातील नाराजीचा सूर उमटल्यानंतर अशी प्रकरण उजेडात येतात.
दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खंडन करीत आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल आहेत, अशी टीका करत उलट आगवणे हेच माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणे लागत असून तसे पुरावे पोलिसांच्या कडे दिले असल्याचे खा.निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमकी कुणाची फसवणूक झाली असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर एकमेकांवरती आरोप केल्याने पोलिसांनी तपास केल्यानंतपर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल असं वाटतं. या प्रकरणाबाबत पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र खा.निंबाळकर यांच्या जवळच्या एकेकाळच्या निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकदा पक्षातील नाराजीचा सूर उमटल्यानंतर अशी प्रकरण उजेडात येतात.