Video : खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छगन भुजबळ यांच्यात भेट, मराठा आणि ओबिसी आरक्षणावर चर्चा
खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ (chhagan bhujbal) हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे (obc) नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ […]
खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ (chhagan bhujbal) हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे (obc) नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर माझी वाटचालही सुरू आहे. पण छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजी छत्रपती यांनी काढले. ओबीसी, एसटी, एससी आणि मराठा समाजाला एकत्र नांदू शकतो यासाठी आमचा प्रमाणिक प्रयत्न सुरू आहे, असंही संभाजी छत्रपती यांनी सागितलं. खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांचे कौतुक केले.