VIDEO : Sanjay Jadhav | शिवसेना खासदार संजय जाधव यांनी छगन भुजबळांचा बाप काढला

VIDEO : Sanjay Jadhav | शिवसेना खासदार संजय जाधव यांनी छगन भुजबळांचा बाप काढला

| Updated on: Aug 09, 2021 | 1:31 PM

कुठल्याशा एका प्रकरणावर बोलताना संजय जाधवांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.

महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. कुठल्याशा एका प्रकरणावर बोलताना संजय जाधवांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. कमिशनरने आदेश देऊनही भुजबळांनी विरोधात पत्र लिहिलं, जशी याच्या बापाची जहागिर होती, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत किती राग आहे, याची झलक त्यांनी आपल्या भाषणात दाखवली.