तुम्हाला बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा

तुम्हाला बाई खुणावेल, डोळा मारेल पण… राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा

| Updated on: Apr 18, 2024 | 4:53 PM

बळवंत वानखेडेंना मतदान करण्याचं आवाहन करताना राऊत म्हणाले, 'तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यवरची नटी आहे. तुम्हाला प्रेमाला बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका... काय झालं पुराणात... विश्वमित्रांचं हरण झालं, ऋषीमुनीपण गेले'

अमरावतीमध्ये भाजपच्या लोकसभा लढवणाऱ्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर बोलत असताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. बळवंत वानखेडेंना मतदान करण्याचं आवाहन करताना राऊत म्हणाले, तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यवरची नटी आहे. तुम्हाला प्रेमाला बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका… काय झालं पुराणात… विश्वमित्रांचं हरण झालं, ऋषीमुनीपण गेले. पण आपण शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहायला हवं. डोळा मारला की आपण जायचं नाही…, असं खोचक वक्तव्य करत राऊतांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर पुढे ते असेही म्हणाले, ‘बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे.’ असे वक्तव्य करत राऊतांनी राणांवर हल्लाबोल केलाय.

Published on: Apr 18, 2024 04:51 PM