मंत्रालय अन् ‘वर्षा’वर गुंडांसोबत ‘चाय पे चर्चा’ होतेय, तुम्हाला माहितीये का? राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल
मंत्रालय आणि 'वर्षा'वर गुंडांसोबत चाय पे चर्चा होतेय, तुम्हाला माहितीये का? ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार खासदार रोज गुंडांबरोबर चाय पे चर्चा करताय आणि अशा हत्या होताय, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री कुठेत? देवेंद्र फडणवीस हे अदृश्य आहेत. गृहमंत्री विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेतात चाय पे चर्चा करत फिरताय. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुवस्थेवरील चर्चा कोण करणार? चाय पे चर्चा कसली करताय. मंत्रालय आणि ‘वर्षा’वर गुंडांसोबत चाय पे चर्चा होतेय, तुम्हाला माहितीये का? ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार खासदार रोज गुंडांबरोबर चाय पे चर्चा करताय आणि अशा हत्या होताय, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली. पुढे ते असेही म्हणाले, अनेक पदांवर अभिषेक घोसाळकर यांनी काम केलंय. ते निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते. या घटनेनंतर राज्यातील गुंडाचा कायदा आणि सुवस्थेचा नंगानाच पाहायला मिळाला तो अस्वस्थ करणारा आहे. राज्याच्या इतिहासात असंच कधीच घडलं नव्हतं. गेल्या काही दिवसांत गुंडांच्याच बातम्या समोर येत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.