स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही, संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल काय?
शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी कोणती गॅरंटी देताय. कोणाला देताय? मोदी शेतकऱ्यांना मारण्याची गँरंटी देताय...
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अशातच हे आक्रमक शेतकरी राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, जर मोदी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमी भाव देऊ शकले तर मी समजेल पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच देशाचे आणि शेतकऱ्यांचे नेते आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. भाजपचं सरकार असूनही भाजप त्यावर कोणतंच भाष्य करत नाही, असे म्हणत राऊत यांनी हल्लाबोल केलाय. मोदी कोणती गॅरंटी देताय. कोणाला देताय? मोदी शेतकऱ्यांना मारण्याची गँरंटी देताय. स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही असे म्हणत राऊतांनी सडकून टीका केली आहे.
Published on: Feb 15, 2024 02:05 PM
Latest Videos