‘सत्ता, कुर्सी के लिए जुबां और मॉ नहीं बेचते’; राऊत यांची भाजपवर घणाघाती टीका

‘सत्ता, कुर्सी के लिए जुबां और मॉ नहीं बेचते’; राऊत यांची भाजपवर घणाघाती टीका

| Updated on: Jul 10, 2023 | 12:17 PM

त्याचबरोबर पत्रकार परिषदेत देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधताना, मुख्यमंत्री पदावरून अडीच अडीच वर्ष असा भाजप आणि शिवसेनेत फार्म्युला ठरला होता. मात्र तो शब्द भाजपने पाळला नाही.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात भाजपवर तिखट टीका केली होती. त्याचबरोबर पत्रकार परिषदेत देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधताना, मुख्यमंत्री पदावरून अडीच अडीच वर्ष असा भाजप आणि शिवसेनेत फार्म्युला ठरला होता. मात्र तो शब्द भाजपने पाळला नाही. हे मी पोहरादेवी आणि आ-वडीलांची शपथ घेऊन बोलतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना टीका केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी, उद्धव ठाकरे यांनी जे काल सभेत सांगितलं ते बरोबर आणि सत्य आहे. कारण आम्ही आध्यात्मिक, धार्मिक आणि संवेदशिल लोक आहोत. आम्ही सत्ता आणि खुर्चीसाठी आमची तत्व आणि आईला विकत नाही, खोटी आश्वासनं देतच नाही अशी घणाघाती टीका भाजपवर केली आहे. तर त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जे बोलणं झालं त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. मात्र तो भाजपने पाळला नाही. आणि आज महाराष्ट्राच्या वाट्याला असे दिवस आले आहेत.

Published on: Jul 10, 2023 12:17 PM