‘सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी श्रेय घेतलं तसं चंद्रयानचं’; राऊत यांनी श्रेयवादावरून पंतप्रधान मोदी यांना सुनावलं
चंद्रयान आता चंद्रावर उतरण्यास काहीच कालावधी शिल्लक राहिला आहे. पण त्याच्या आधीच येथे श्रेयवाद सुरू झाला आहे. यावरून ठाकरे गटाकडून भाजपवर टीका करण्यात आली आहरे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | आपल्या देशाने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले आणि आता ते उद्या म्हणजे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. त्याचदरम्यान रशियाचे लुना-25 नष्ट झाले आहे. त्यावरून सध्या देशात चंद्रयानावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. तर यावरून भाजप नेत्यांकडून आता विधानं केली जाऊ लागली आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना टीका केली आहे. राऊत यांनी, यशाचं श्रेय हे वैज्ञानिकांचं आहे. वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. मागील ३० वर्षांपासून त्यांचे यावर काम सुरू आहे. त्याचं श्रेय वैज्ञानिकांनाच द्याव लागेल. हे राजकीय पक्षाने, श्रेय घेता कामा नये. पण सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी असेच श्रेय एका पक्षाने निवडणुकीत घेतलं. मग चीनवर का सर्जिकल स्ट्राईक करत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर राहुल गांधी यांनी जे काल सांगितलं ते १०० टक्के सत्य असल्याचे देखील ते म्हणालेत.