राऊतांचा जामीन रद्द करा, ईडीची मागणी; आता पुढे काय…
संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या पत्राचाळ प्रकरणात जामीन रद्द करण्यासंदर्भातील ईडीच्या याचिकेवरील आज 15 मार्च रोजी इडीच्या याचीकेवर सुनावणी होणार आहे.
मुंबई : खासदार संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या बाबत पत्राचाळ प्रकरणी उच्च न्यायालयाने जामीन रद्द करण्याबाबत आता 15 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊतच्या मालकीच्या काही कंपन्या होत्या. प्रवीण राऊत यांच्या मालकीच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनाच्या नावेच पत्राचाळ घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ते कारागृहात देखिल होते. ते आता जामीनावर बाहेर आहेत. त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीने याचिकेतून उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज संजय राऊत यांचे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.