... तरीही पत्रव्यवहार करता? देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' पत्रावर संजय राऊत यांचा खोचक टोला

… तरीही पत्रव्यवहार करता? देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावर संजय राऊत यांचा खोचक टोला

| Updated on: Dec 08, 2023 | 1:24 PM

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आणि अजित पवार यांनाच थेट सभागृहात उभं राहून सांगावं, असाही हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांच्यावर बोलतात मग प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना केलाय

मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहामध्ये बाजू-बाजूला बसता तरीही पत्रव्यवहार करतात, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावर खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आणि अजित पवार यांनाच थेट सभागृहात उभं राहून सांगावं, असाही हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांच्यावर बोलतात मग प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तर मलिक यांचे दाऊदशी संबंध होते. देशद्रोह्याशी संबंध असलेल्यांसोबत आम्ही बसू शकत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्राद्वारे दिला आहे. फडणवीस यांच्या या विधानाची संजय राऊत यांनी टेर उडवली आहे.

Published on: Dec 08, 2023 01:24 PM