तर कट्यार काळजात घुसणारच, फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पटलावर; म्हणाले, चाकू-सुऱ्यातून...

तर कट्यार काळजात घुसणारच, फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पटलावर; म्हणाले, चाकू-सुऱ्यातून…

| Updated on: Mar 10, 2024 | 6:11 PM

नटसम्राटासारखे वागल्यास कट्यार काळजात घुसणारच आणि त्यांची वेदना ही होणारच आहे. नटसम्राटासारखे वागल्यास नटसम्राट होता येत नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावर संजय राऊतांचा पलटवार काय?

मुंबई, १० मार्च २०२४ : शिवसेनेचा जन्म चाकू-सुऱ्यातून झाल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. इतकंच नाहीतर आमची कट्यार कुठे घुसते हे भाजपला माहिती आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिलंय. दरम्यान, नटसम्राटासारखे वागल्यास कट्यार काळजात घुसणारच आणि त्यांची वेदना ही होणारच आहे. नटसम्राटासारखे वागल्यास नटसम्राट होता येत नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. ‘आधी कट्यार कंबरेवर बांधायला शिका. चाकू सुऱ्यावाले आम्ही लोकं आहोत. आमची शिवसेना चाकू-सुऱ्यातून वाढली आहे. आम्हाला शिकवू नका कट्यारीच्या गोष्टी…आमची कट्यार घुसली ना…ती कुठे घुसते ते त्यांना माहितीये’, असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर पलटवार केलाय.

Published on: Mar 10, 2024 06:11 PM